सोहेल खान करत आहेत सर्वधर्म समभावाचे जतन; मुस्लीम असूनही घरी गणरायाची स्थापना

0

नागपूर,दि.3: नागपूरचे सोहेल खान सर्वधर्म समभावाचे जतन करत आहेत. अनेकदा आपण धर्माच्या नावावर होत असलेली हिंसा आणि द्वेष याबद्दल ऐकत असतो. मात्र अशातच नागपूरच्या रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या या मुस्लीम परिवाराने सर्वधर्म एक आणि सबका मालिक एक याचा खरं उदाहरण जगापुढे मांडलयं.

गणराया म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक; पण नागपूरच्या सोहेल खान यांनी गणरायाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले. मुस्लीम असूनही गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या घरी गणरायाची स्थापना करीत आहेत. त्यांचे कुटुंबीयही  मोठ्या भक्तिभावाने दहा दिवस  गणेशाची विधीवत पूजाअर्चा व भक्ती करतात. त्यांच्या घरी होणाऱ्या या उत्सवात त्यांचे शेजारीदेखील पूर्ण भक्तिभावाने सहभागी होतात. 

सोहेल खान व त्यांचे कुटुंबीय आपल्या मुस्लीम धर्माच्या पाच वेळेच्या नमाजदेखील नित्यनेमाने करतात. त्यांच्या घरी ज्या हॉलमध्ये गणपती विराजमान आहे, त्याच हॉलमध्ये  बाजूला नमाजही सुरू असते. त्यामुळे भक्तीचे एक वेगळे दर्शन आपल्याला नागपूरच्या खान कुटुंबीयांच्या घरी पाहायला मिळते.

खान परिवार गणपतीच्या आस्थेत विलीन झालाय. सिझेन हा गेल्या दहा वर्षांपासून गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी करतो. दीड दिवस किंवा पाच दिवस नव्हे तर तब्बल दहा दिवस गणपती बाप्पा सिजनच्या घरी विराजमान असतात. सिझेन पूर्ण श्रद्धेने आणि आस्थेने त्यांची सेवा करतो. सकाळ संध्याकाळची बाप्पांची आरती सिझेनला मुखपाट आहे. बाप्पांसाठी प्रसाद आणि गळ्यात घालणारा हारसुद्धा तो स्वतः बनवितो. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here