सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत झाले इतके मतदान

0

सोलापूर,दि.७: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघापैकी सोलापूर लोकसभा व माढा मतदार संघात दुपारी ५ पर्यंतची मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात दुपारी ५ पर्यंत ४९.८५ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण सोलापूरमध्ये सर्वाधिक ५१.८८ टक्के मतदान झाले आहे. तर आमदार प्रणिती शिंदे यांचा मध्य मतदार संघात ४७.०१ टक्के मतदान झाले आहे. भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदार संघात ५१.२१ टक्के झाले आहे.

सोलापूर लोकसभा

तर माढा लोकसभा मतदार संघात दुपारी ५ पर्यंत ५०.१६ टक्के मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस मतदार संघात दुपारी ५ पर्यंत सर्वाधिक ५६.०३ टक्के मतदान झाले आहे. तर फलटण मतदार संघात ५१.९७ टक्के झाले आहे.

माढा लोकसभा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here