छत्रपती संभाजीनगर,दि.३१: वाळूज औद्योगिक वसाहतीतील आगीत होरपळून सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या कारखान्याला शनिवारी मध्यरात्री २ वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती. या आगीने ३ वाजता रौद्र रूप धारण केले. यात १५ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ६ कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलविण्यात आले होते.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील २१५-१६ सेक्टरमध्ये हँड ग्लोव्हज तयार करणारा सनशाईन इंटरप्राईज हा कारखाना आहे. यात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. काय झाले, हे कळायच्या आत कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात कंपनीला आगीने वेढले.
लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. अग्रिशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुम शेख (३३) मृतांची नावे आहेत.








