Sinnar-Shirdi Highway Accident: ट्रक व खासगी बसचा सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात

Nashik Accident: शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस व ट्रक यांचा अपघात

0

नाशिक,दि.13: सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात (Sinnar-Shirdi Highway Accident) झाला आहे. सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे  शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला. शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस व ट्रक यांची समोरासमोर धडकून त्यानंतर खाजगी बस उलटली. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. (Accident News)

बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी | Accident News

आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून अनेक रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णालयाला नेण्यासाठी दाखल झाले आहेत. वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर आहे.

Sinnar-Shirdi Highway Accident
भीषण अपघात

समोरासमोर धडक होऊन अपघात | Sinnar-Shirdi Highway Accident

अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस क्रमांक एम एच 04 एफ के 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालटक क्रमांक एम एच 48 टी 12 95 आहे. यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.  महामार्गाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.

15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या

उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी. बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. त्यामुळे मृतांची नावे व बसमधील प्रवाशांची नावे कळण्यास उशीर लागेल.जखमींना विविध ठिकाणी नेल्याने मृतांची व जखमींची नावे कळण्यास उशीर होईल.अपघात ग्रस्त खाजगी बस पाच नंबरची असल्याचे कळते गाईड कंपनीची खासगी आराम बस आहे.अपघातास बस एक बाजू पूर्णपणे कापली गेली. जखमींमध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. मृतांचा नेमका आकडा करण्यास उशीर होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here