तरुणाचा जीव वाचवण्यासाठी शीख तरुणांनी काढली आपली पगडी

0

दि.20: पगडी (Turban) म्हणजे शीख (Sikh) बांधवांची शान, त्यांचा मान. काही झालं तरी शीख लोक आपल्या पगडीला धक्काही लागू देत नाहीत. पण याच पगडीने काही शीख तरुणांनी एका तरुणाचा जीव वाचवला आहे. पगडीचा दोर करून त्यांनी तरुणाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही कडक सॅल्युट कराल.

कॅनडात (Canada) शीख बांधवांनी केलेल्या कामाचं कौतुक होतं आहे. पाच शीख तरुणांनी एका पर्यटकाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आहे. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपली पगडी सोडली. @BCSikhs ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

गोल्डन इअर्स प्रां पार्कमध्ये सोमवारी घडलेली ही घटना आहे. व्हिडीओत पाहू शकता हा तरुण डोंगरावरून घसरून पाण्यात बुडणारच होता. त्याला पाहताच पाच शीख तरुण धावत आले. त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या डोक्यावरील पगडी काढली. ती एकमेकांना बांधून त्यांनी त्याचा दोर केला आणि तो पाण्यात बुडणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकला. तरुणाने तो दोर धरला आणि शीख बांधवांनी त्याला खेचत बाहेर आणलं. तर डोंगराच्या वरच्या बाजूने शीख तरुण या तरुणाला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. शेवटी पगडीचा दोर करून त्यांनी त्याला मृत्यूच्या दारातून खेचून काढलंच. या शीख बांधवांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे, त्यांना सलाम केला जातो आहे.

याआधी भारतातही अशाच एका शीख बांधवाने आपल्या साथीदारासाठी पगडी काढली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत एक शीख जवान जखमी झाला. त्यावेळी दुसऱ्या शीख जवानाने आपली पगडी काढून साथीदाराच्या जखमेवर बांधली. ही घटना स्पेशल डीजीपी आरके विज यांनी ट्विट केली. शीख जवानाच्या हिमतीला सलाम, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here