Side Effects Of Eggs: अंडही आरोग्यासाठी ठरु शकतं घातक, आरोग्यावर होऊ शकतो दुष्परिणाम

0
अंडे

नवी दिल्ली,दि.28: Side Effects Of Eggs: अंडही आरोग्यासाठी घातक ठरु शकतं, आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. रोजचा आहार हेल्दी ठेवण्यासाठी लोक दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टींचा समावेश करत असतात. मात्र आपण जे हेल्थी म्हणून खातो ते योग्य आहे का अयोग्य हेदेखील माहित असणं गरजेचं आहे. बहुतांश लोक आपल्या दैनंदिन आहारात अंड्याचा आवर्जुन वापर करतात. मात्र अंड्यात जेवढ्या हेल्दी गोष्टी असतात तसंच काही घातकही आहे. त्यामुळे अंड्यातील कोणत्या गोष्टी खाल्ल्यावर शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो याविषयी जाणून घेऊ या.

दरम्यान, अहवालानुसार, अंडी जेव्हा कोंबडीच्या संक्रमित विष्ठेच्या संपर्कात येतात तेव्हा ते साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात. यामुळे अतिसार, पोटात पेटके, उलट्या, ताप, मळमळ आणि डोकेदुखीसह अन्नातून विषबाधा होऊ शकते. जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर अंडी नेहमी धुतल्यानंतरच वापरा. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या अहवालानुसार अंड्यांमध्ये आढळणारे पिवळे बलक उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी विषासारखे आहे. हे खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊ शकतो.

आहारतज्ञांचे म्हणणे आहे की एका मोठ्या अंड्यातील पिवळ बलकमध्ये सरासरी 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. या पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल आढळल्यामुळे ते ब्लॉक होऊ शकतात. त्याचा जास्त वापर करणं घातक ठरू शकतं.

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात जे तुमचे आरोग्य चांगले ठेवतात. डॉक्टरांच्या मते, अंडी शरीरातील आवश्यक चरबीची कमतरता पूर्ण करते आणि त्याचं प्रमाण नियंत्रित करते. संशोधनात असं दिसून आलं आहे की दररोज एक अंडे खाल्ल्यानं वजन नियंत्रित होतं, भूक कमी होते आणि तणाव कमी होतो. डोळ्यांसाठीही ते उत्तम असतं. यामध्ये अंड्यांचे दुष्परिणामही सांगितले आहेत.

अंडही आरोग्यासाठी ठरु शकतं घातक | Side Effects Of Eggs

अंड्यामध्ये अशीही गोष्ट आहे जी खाल्ल्यावर काही लोकांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी अंड्यापासून दूर राहावं. अमेरिकन शास्त्रज्ञांना एका अभ्यासात असं आढळून आलं, मधुमेह असणारे रुग्ण दर आठवड्याला तीन किंवा त्यापेक्षा जास्त अंडी खातात त्यांच्या रक्तातील साखर 39 टक्क्यांनी वाढते. चीनमध्ये, बहुतेक लोकांना यामुळे मधुमेहाचा त्रास होतो. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही जास्त अंडी खाणं टाळावं. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here