देशात एखाद्या देवस्थान क्षेत्रात अन्नछत्र कसे असावे याचा आदर्श म्हणजे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ: जयप्रकाश अभंगे

0

अक्कलकोट,दि. 24 : जेष्ठ पत्रकार व सोलापूर महानगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती जयप्रकाश तथा जे.पी. अभंगे यांनी नुकतेच अक्कलकोट येथे सहपरिवार श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नव्हे तर देशात एखाद्या देवस्थान क्षेत्रात अन्नछत्र कसे असावे याचा आदर्श म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोटातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ असल्याचे मनोगत जेष्ठ पत्रकार जयप्रकाश अभंगे यांनी व्यक्त केले.

ते सहपरिवार तीर्थ क्षेत्र अक्कलकोट येथे आले असता न्यासाच्या वतीने त्यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रमेश हेगडे, बाळू पोळ, सिद्धराम कल्याणी, एस.के. स्वामी, शहाजीबापू यादव, समर्थ घाडगे, सतीश महिंद्रकर, कल्याण देशमुख, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, चंद्रकांत हिबारे, नामा भोसले, गोविंदराव शिंदे, दत्ता माने, अप्पी बिराजदार, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, अनिल बिराजदार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here