Darshan Thoogudeep: अभिनेता दर्शन थुगुदीपबाबत हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

0

बेंगलूरू,दि.13: चैलेंजिंग स्टार नावाने प्रसिध्द असलेल्या अभिनेता दर्शन थुगुदीपबाबत (Darshan Thoogudeep) हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नडचा प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपचे नाव कर्नाटक हत्त्या प्रकरणात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कन्नड सुपरस्टार दर्शन थुगुदीपला मंगळवारी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी सातत्याने समोर येत आहेत.

दरम्यान, अलीकडेच पोलिसांनी सांगितले की, दर्शन थुगुदीपने तीन जणांना या प्रकरणाची जबाबदारी घेण्यास सांगितले होते आणि त्या बदल्यात त्यांना पैसे दिले होते. त्याने तिघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची ऑफर दिली होती. 

चित्रपटात इतका चांगला अभिनय करणारा दर्शन थुगुदीप असे काही करु शकतो हेच त्याच्या चाहत्यांना पटत नव्हते. आपला आवडता स्टार असे काही करणार नाही, हेच ते सुरुवातीला म्हणत होते. पण पोलीस तपासाचे धागे हळुहळू दर्शनच्या दिशेने जाऊ लागले आणि दर्शन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. चित्रदुर्गा येथे राहणाऱ्या रेणुकास्वामी या इसमाच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. त्याचा मृतदेह बेंगळुरूमधील नाल्याजवळ सापडला होता. या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण? | Darshan Thoogudeep

चित्रदुर्गा येथे राहणारा रेणुकास्वामी हा सोशल मीडियावर सक्रीय होता. तो दर्शनची मैत्रिण पवित्रा गौडाच्या सोशल मीडिया पोस्टवर अश्लील कमेंट्स करायचा, असा आरोप आहे. यामुळे अभिनेता दर्शन खूप चिडला होता. दर्शनने रेणुकास्वामी कोण आहे? कुठे राहतो याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. यासाठी त्याने चित्रदुर्गातील त्याच्या फॅन क्लबचे संयोजक राघवेंद्र उर्फ रघू याला कामावर ठेवले. रघुचं त्याला आपल्या घरातून घेऊन गेला असा आरोप रेणुका स्वामीच्या पत्नीकडून करण्यात आला. रेणुकास्वामीचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना बेंगळुरूमधील कामाक्षिपल्या येथील एका शेडमध्ये नेण्यात आले. दर्शनने रेणुकास्वामी यांना त्या शेडमध्ये बेल्टने मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या साथीदारांनी रेणुकास्वामीला लाठ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्याला भिंतीवर आपटण्यात आले यानंतर त्याची हत्या करण्यात आली. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ‘गुन्हेगाराला कायद्याच्या कक्षेत राहून शिक्षा झाली पाहिजे, असे आम्ही म्हणत आहोत.’ 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here