नाशिक,दि.10: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकमध्ये एका धावत्या शिवाशाही बसने (Shivshahi Bus) पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने सर्वानांच धक्का बसला. प्रवासी खाली उतरताच काही मिनिटांतच संपूर्ण बसने पेट घेतला. बघातच क्षणी संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये 25 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची कळताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
25 प्रवाशांनां घेऊन निघालेल्या शिवशाही बस ने अचानक पेट घेतल्यामुळे प्रवाशी घाबरले. मात्र बसचे चालक आणि वाहक यांनी न घाबरता प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला करून थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अपघात टाळला गेला. बसच्या चालक आणि वाहकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.