नवी दिल्ली,दि.१२: शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मागच्या महिन्यात कोर्टाकडे केली होती. गेल्या ३ वर्षापासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दोन्ही पक्षाचे वकील अंतिम युक्तिवाद करतील. त्यानंतर कोर्टाकडून या खटल्यावर निकाल येणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मागच्या महिन्यात कोर्टाकडे केली होती. ‘शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण सोबत हेही प्रकरण आम्ही 12 नोव्हेंबरला ऐकू’, असं त्यावेळी न्यायमूर्ती यांनी सिब्बल यांना सांगितल होतं. मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करावं यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदाराला अपात्र न केल्याने सुनील प्रभू पुन्हा कोर्टात आले होते. त्यावर कोर्ट दोन्ही प्रकरण (पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रता) प्रकरण सोबत ऐकत का हे पाहणं महत्वाचं आहे.








