औरंगाबाद,दि.१६: shivsena: शिवसेना आमदारावर महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्यातील एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप प्रकरण वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसत आहे. कारण, आता आमदार बोरनारे यांच्यावर याप्रकरणी विनयभंगचे कलमे लावण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जवबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आपला विनयभंग झाला असल्याचा आरोप सुध्दा या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आता आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलमे लावण्यात आली आहे.
आम्ही यापूर्वीच आरोपीविरुद्ध विनयभंगाच्या कलम ३५४-बी सह कलम ३२६ चा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाखाली जामीनपात्र कलमे लावण्यात आली. तसेच जी कलमे वाढवण्यात आली आहे. त्यावरही आपण असमाधानी असून, याबाबत पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाले आहेत.