मुंबई,दि.21: शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. आज रात्री साडे नऊ वाजता नागपूर येथे भाऊ चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. (Shivsena News)
भाऊ चौधरी संजय राऊत यांचे निकटवर्तीय | Shivsena News
संजय राऊत यांच्या कायम सावली सारखे बरोबर राहणारे म्हणून भाऊ चौधरी यांना ओळखले जाते. भाऊ चौधरी हे नाशिकचा कारभार सांभाळत होते. संजय राऊत तुरुंगात जाताना आणि तुरुंगातून बाहेर येताना देखील भाऊ चौधरी त्यांच्या बरोबर होते. परंतु, आता ते शिंदे गटाचा प्रवेश करणार आहेत.
भाऊ चौधरी यांची हकालपट्टी | Shivsena News
दरम्यान, भाऊ चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. “शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
