मुंबई,दि.22: Shivsena And VBA Alliance: शिवसेना वंचित बहुजन आघाडी युती संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे अनेक नेते आमदार शिंदे गटात दाखल झाले. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी समर्थन देत युती करण्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आले होते. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच युती होणार असल्याचे वक्तव्य केले होते.
युतीचा मुहूर्त अखेर ठरला | Shivsena And VBA Alliance
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? | Prakash Ambedkar
दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
आम्ही केवळ दलितांपुरतं मर्यादित राहावं…
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं. परंतु आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपुरतं मर्यादित राहावं अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.