सोलापूर,दि.30: अक्कलकोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख संजय देशमुख (Sanjay Deshmukh) व अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार (Yogesh Pawar) यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पक्षपदाचा आणि पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. तरीही अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहिले होते.
सोलापूरमध्ये (अक्कलकोट तालुका) मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उपसले आहे. अक्कलकोट तालुका शिवसेना आणखी 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे दोन दिवसात मोठे खिंडार पडले आहे. राजीनामा दिलेले पदाधिकारी व कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
अक्कलकोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दोन दिवसात मोठे खिंडार पडले आहे. शुक्रवारी अक्कलकोट तालुका प्रमुख, शहर प्रमुखानी राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. आणखी पंधरा पदाधिकारी राजीनामा दिला आहे.
बार्शी तालुक्यातील महत्वाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व अन्य पदाधिका-यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा आणि पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आता हे पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार का याची चर्चा सुरू झाली आहे की अन्य पक्षांमध्ये जाणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे.