राज्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या देय रकमा उपलब्ध करून द्या: शिवानंद भरले

0

पुणे,दि.29: राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवृत्ती नंतरचे पेन्शन उपदान व अंशराशीकरण रक्कम मिळण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अध्यक्ष शिवानंद भरले यांनी शिक्षण आयुक्त सुरज माढंरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सन 2022-23 या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाना निवृत्ती नंतरचे कोणतेही रकमा मिळाले नाहीत. स्थानिक पातळीवर विचारणा केली असता शासनाकडून आर्थीक निधीच नाही म्हणून सागीतले जाते.

राज्यातील सूमारे 5 ते 6 हजार जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. त्याना निवृत्ती नंतरचे पेन्शन देय रकमेसाठी 1050 कोटी रूपये लागतात. डिसेंबर महीन्यात पेन्शन डे आहे त्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्ताकडे निधी उपलब्ध करून द्यावा असे भरले यांनी समक्ष भेटून मागणी केली आहे.

शिवाय या पुर्वी 15 सप्टेबरला सातव्या वेतनाचे हप्ते देण्यासाठी लेखाशिर्ष 36 खाली रकमा दिली आहे. त्या रकमा शालार्थ मधूनच देण्यासाठी शासनाची तरतूद आहे. त्यामूळे सेवानिवृत्त शिक्षकांना दुसरा, तीसरा हप्ता मिळाला नाही. जिल्हा परिषद स्तरावर शिल्लक आहेत या रकमा लेखाशिर्ष 4 खाली खर्ची टाकून सेवानिवृत्त शिक्षकान दुसरा व तिसरा हप्ता रोखीने देण्यात यावा असेही मागणी या वेळी करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here