Sunil Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊच गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत?

0

मुंबई,दि.26: Sunil Raut: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हेच आता एकनाथ शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त न्युज 18 लोकमतने दिले आहे. संजय राऊत हे आक्रमकपणे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. बंडखोर 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे समर्थक आमदारांची संख्या कमी असेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांच्याकडे समर्थक आमदारांची संख्या वाढत गेली. शिवसेनेचे अनेक मंत्री त्यांच्या गटात सामिल झाले. या बंडात सुरुवातीला 20 ते 25 आमदार होते. त्यानंतर हळूहळू इतर आमदार शिंदे यांच्या गोटात जावून मिळाले. शिंदे यांचा आमदारांचा गट हा आसामच्या गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये थांबला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासातील अनेक दिग्गज नेते या बंडात सहभागी झाले आहेत.

या बंडाचं ज्यांनी नेतृत्व केले ते एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे आणखी एक आश्चर्यकारक बामती समोर आली आहे. बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वारंवार प्रहार करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज18’ ला दिली आहे.

एकनाथ शिंदे गटातील खात्रीलायक सूत्रांनी ‘CNN News18’ला याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील होऊ इच्छित आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे संजय राऊत हे बंडखोर 40 आमदारांवर सडकून टीका करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करत आहेत. असं असताना त्यांचा सख्खा भाऊ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना घरातच फुटली की काय? असं चित्र आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here