Sanjay Raut: शाहरुख खानबाबत धार्मिक राजकारण करणाऱ्यांना शिवसेना नेते संजय राऊतांनी फटकारले

0

मुंबई,दि.7: Sanjay Raut On Shahrukh Khan: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अनेक अवयव निकामी (Multiple Organ Failure) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्कात रविवारी संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर धार्मिक राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. हा नालायकपण आणि बेशरमपणा आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यदर्शनाला आलेला अभिनेता शाहरुख खान याचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खान याने मुस्लीम रिवाजाप्रमाणे लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी शाहरुख खान लतादीदींच्या पार्थिवावर थुंकला, अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी संबंधित ट्रोलर्सना चांगलेच फटकारले.



लतादीदींच्या निधनानंतरही वाद निर्माण केला जात आहे. तुम्ही लतादीदींनाही सोडत नाही. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. शाहरुख खान याने त्याच्या पद्धतीने दुवा मागितला. पण एका परिवाराचे लोक त्याला ट्रोल करत आहेत. हा नालायकपणा, बेशरमपणा आहे. कोणाच्यातरही निधनानंतर तुम्ही एका एखाद्या कलाकाराला ट्रोल करत आहात. तुम्ही देशाची वाट लावली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here