Jitendra Awhad: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर केली टीका

0

मुंबई, दि.8: Jitendra Awhad On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत बुधवारी (दि.5) मोठी चूक (PM Modi Security Breach) झाली होती. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये त्यांची मोठी सभा होणार होती. मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यावरच अडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक (PM Modi Security Breach) घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावा करत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादंग सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा पं. नेहरुंचा फोटो शेअर करत मोदींवर टीका केली आहे.



“संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची डॉ. लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वातंत्र्य झाला. मला काय मिळाले?, त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले…पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य. नेहरुजी हे म्हटले नाही माझ्या जीवाला धोका आहे..!”, असं ट्विट आव्हाड यांनी केलंय. संसद परिसरात घडलेल्या या घटनेचा संदर्भ देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.



दरम्यान, यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. राजीव गांधी यांच्यावर राजघाट येथे झाडाच्या मागे लपून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या पी.एस.ओच्या कानाला लागून गेली होती. त्यानंतही तरीही राजीव गांधी यांनी हसतमुखाने सांगितले होते की ते ठीक आहेत. या घटनेबद्दल माहिती देत त्यांनी मोदींना सुनावलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here