मुंबई,दि.21: शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर मोठे विधान केले आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खडसे यांनी भाजपा पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. खडसे निवडून आले.
एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांना कंटाळून भाजपा पक्ष सोडणारे एकनाथ खडसे पुन्हा भाजपा पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान शरद पवार यांनी एकनाथ खडसे नाईलाजास्तव भाजपात जात असल्याचा दावा केला आहे.
“सध्या जितके व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत, तितके याआधी महाराष्ट्रात होत नव्हते. यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदातिच हीच अवस्था एकनाथ खडसेंची झाली असावी. त्यामुळे नाईलाजाने निर्णय घेतला असावा असं मला वाटत आहे,” असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.