Sharad Pawar On Shivsena: शरद पवार यांचं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधानं

0

मुंबई,दि.1: Sharad Pawar On Shivsena: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठं विधानं केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

उद्धव ठाकरेंचा फोन कट केला

पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेना संपली नाही आणि संपणारही नाही असे सांगितले. पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. मात्र त्यांना नंतर बोलतो असं कळवलं अशीही माहिती पवारांनी दिली.

एकनाथ शिंदेबाबत जी भूमिका भाजपाने घेतली ती आधीच घेतली असती तर हे सगळं झालं नसतं. शिवसेना आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो. पक्ष निर्णय घेतो, तिकीट देतो, निवडून आलेले 5 वर्षासाठी असतात परंतु पक्ष कायम असतो असं सांगत शरद पवारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच राहील असे स्पष्ट केले.

चित्र उलट असेल

शिवसेनेचे लोक परत येतील असं वाटत नाही. जी काही देवाण-घेवाण झाली असेल ती झाल्यानंतर परत फिरणं होणार नाही. गुवाहाटीला त्या हॉटेलभोवती 300 पोलीस होते, कुणाला आत जायची परवानगी नव्हती. त्यामुळे संपर्क साधता आला नाही. बंडखोर आमदारांसोबत काय करायचं हा शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे. लोकांना आता जे झाले ते आवडलं नाही. ठाकरे लोकांमध्ये जातील तेव्हा चित्र उलट असेल असा दावाही पवारांनी केला आहे. 

महाविकास आघाडी

राज्यातील राजकारणात घडलेल्या या घडामोडीमुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी माध्यमांत याबाबत मोठे विधान केले. शरद पवार म्हणाले की, आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही असं विधान केल्यानं मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here