Sharad Pawar Yeola: ‘आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर, असेल नसेल तर सर्व यंत्रणा वापरा जर…’ शरद पवार

0

नाशिक,दि.8: Sharad Pawar Yeola: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये पोहोचले. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. महाराष्ट्रात नाशिक (Nashik) जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांनी साथ सोडली नाही, आज मी इथे आलोय तर ते कोणावर टीका करण्यासाठी नाही, आज मी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, म्हणून आज इथे आल्याचे शरद पवार म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) यांची येवल्यात (Yeola) जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, ज्यावेळी कधी तुमच्यासमोर येण्याची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, महिन्यात येईल, वर्षांनी येईल. त्यावेळी मी पुन्हा तुमच्यासाठी येईल. त्यावेळी योग्य निकाल सांगेल. त्यावेळी अंदाज चुकणार नाही. राजकारण कधी करायचं तर सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी. स्वातंत्र्य चळवळीत देखील हा तालुका, जिल्हा नेहमीच अग्रभागी राहिलेला आहे. नाशिक (Nashik district) जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जात आहे. मात्र येवला मतदारसंघात आजही अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सोबत असून तुमची माफी मागण्याचे माझे कर्तव्य असल्याचे शरद पवार म्हणाले.

आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर, असेल नसेल तर सर्व यंत्रणा वापरा… | Sharad Pawar Yeola

शरद पवार पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की, ज्यात चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे म्हणून आम्ही झगडत होतो. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी भाषणात काँग्रेसवर टीका केली, राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. माझं पंतप्रधान यांना सांगणे आहे की आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर, असेल नसेल तर सर्व यंत्रणा वापरा, जर आम्ही दोषी असलो तर कारवाई करा, आमची जी काही चौकशी करायची ती करा, जो काही निष्कर्ष निघेल, तो आम्ही स्वीकारायला तयार आहे, अन्यथा माफी मागा, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

अजित पवार यांना कडक इशारा

‘काही जण म्हणाले, तुमचं वय झालं, तुम्ही निवृत्त व्हा, वय झालं हे खरं आहे, 82 झालं आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही.जास्त काही सांगायची गरज नाही. उगाच वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार करू नका’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडक इशारा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here