Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…

BJP शी चर्चा झाली होती का?

0

मुंबई,दि.8: Sharad Pawar Vs Ajit Pawar: BJP शी चर्चा झाली होती का? अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. पवार घराण्यातही फूट पडली. काका पुतणे समोरासमोर उभे राहिले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर व चिन्हावर दावा सांगितला आहे. पुतण्यामुळे शरद पवारांसमोरील आव्हान वाढले आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

दरम्यान, बुधवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन करताना अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव न घेता अनेक गौप्यस्फोट केले होते. तसेच खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी 2014, 2017 आणि 2019 मध्ये चर्चा झाली होती, असा दावा केला होता. अजित पवार यांनी केलेल्या या दाव्यावर शरद पवार यांनी मान्य केला आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत चर्चा झाली होती. मात्र विचारसरणी वेगळी असल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले शरद पवार? Sharad Pawar Vs Ajit Pawar

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सांगितले की, आम्ही 2014, 2017 आणि 2019 मध्ये भाजपासोबत चर्चा केली होती. मात्र आपली विचारसरणी वेगळी असल्याने आपण असं करता कामा नये, असं मी ठरवलं. प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही गोष्ट समजण्याचं गांभीर्य नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

मी पक्षाला पुन्हा उभं करेन | Sharad Pawar

दरम्यान, राज्यात सध्या स्थिर सरकार तर आहे. मात्र हे सरकार दिल्लीतीली भाजपाकडून चालवलं जाणार आहे. तसेच येथे इतर लोकांना केवळ मंत्रिपद मिळेल, असा चिमटा शरद पवारांनी काढला. ते पुढे म्हणाले की, कुटुंबात जे काही झालं त्याची चर्चा मी बाहेर करणार नाही. मला नक्कीच वाईट वाटलं. हे सारे जण माझे जवळचे होते. मात्र मी आधीही अशा घटनांचा सामना केला आहे. मी पक्षाला पुन्हा उभं करेन. निवडणूक आयोगामध्ये काय होईल. त्याने फरक पडत नाही. मी जमीनीवर काम करेन, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

मी वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here