Sharad Pawar: चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची जोरदार टीका

Sharad Pawar: चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली होती टीका

0

पुणे,दि.15: Sharad Pawar On Chandrakant Patil: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांवर भाष्य केले.

काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar On Chandrakant Patil

पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. त्यांचे एक घर कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर सोडून कोथरूड येथे त्यांना यावे लागले. कोथरूडमध्ये त्यांचे काय योगदान होते त्याबद्दल कोथरूडकरांनाच विचारलेले बरे राहील. तसेच, ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही. त्यांच्यावर काय भाष्य करावे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

Sharad Pawar On Chandrakant Patil
शरद पवार

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यामध्ये तर यांची मक्तेदारी असल्यासारखं वागत होते. पहिल्यांदा जिल्हा बँकेत सुरुंग लावला. पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणूक होणार आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक हे लग्न आहे, त्यामुळे सगळ्यांनी काम करून निवडणूक जिंकायची आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here