छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.१६: छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देशातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतेमंडळींनी आक्षेपार्ह विधान केली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाचे प्रवक्ता आणि आमदाराचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले यांनी रायगडवर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केलं होतं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उदयनराजे भोसले यांनी भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कौतुक केलं आहे. “उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. पण, राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका बघ्याची आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे,” असं शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचे होते. मला खात्री आहे, आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. लवकरच तो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल,” अशी आशा शरद पवारांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here