Sharad Pawar On Baramati LokSabha: बारामतीच्या निकालाबाबत शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

0

सोलापूर,दि.23: Sharad Pawar On Baramati LokSabha: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या निकालाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. पत्रकार प्रशांत कदम (Reporter Prashant Kadam) यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी बारामतीच्या निकालाबाबत वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले आहे. 4 जूनला मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल लागणार आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतमोजणीपूर्वीच एक सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजय यांच्यात म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या ठिकाणी शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक होत आहे. 

संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. पवार कुटुंबातच ही लढत झाल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार यांनी पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

…हे आज सांगता येणार नाही | Sharad Pawar On Baramati LokSabha

बारामतीत विजयाची खात्री आहे का? असा प्रश्न मुलाखतीत शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं. ‘बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच झाला नाही. पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात. त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही’, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.

भाजपाबरोबर युती करणार का?

लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

विधानसभेलाही एकत्र लढावे | Sharad Pawar

विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे असे मला वाटत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. लोकसभेला 48 जागाच होत्या, माझा पक्ष जरी छोटा होता असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष होता. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जास्त जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. परंतु आपण तिघे एकत्र यायचे त्यामुळे सामंजस्य राखले जायला हवे होते, ते आम्ही पाळल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभेला 288 जागा आहेत, एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल, असे सांगत यावेळी राष्ट्रवादी कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला दिला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here