Sharad Pawar On 2000 Note | नोटबंदी केल्यानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे: शरद पवार

0

मुंबई,दि.२२: Sharad Pawar On 2000 Note: नोटबंदी केल्यानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे असे शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. RBI ने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. २ हजारांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर देशभरात चर्चा सुरू असून, विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. 

एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा | Sharad Pawar On 2000 Note

एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला गेला आहे. नोटबंदीबाबत काही तक्रार आलीच तर विरोध कमी होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी जो ताजा निर्णय घेतलाय तो एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत असा घेतलेला दिसतोय. मागे अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर त्यात खूप लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकेत त्या काळात काही कॅश होती. काही कोटींमधील ही रक्कम बदलून देण्याची जबाबदारी असताना ती बदलून दिली गेली नाही. पुणे जिल्हा बँकेचे त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले, असेच कोल्हापूरच्या मध्यवर्ती बँकेचेही झाले, असे शरद पवार यांनी सांगितले.

पण देशात चमत्कार एवढाच झाला की | Sharad Pawar

शरद पवार पुढे म्हणाले की, म्हणजे निर्णय घ्यायचे आणि हे निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांना बदल करुन द्यायची जबाबदारी पाळायची नाही. आम्ही काही वेगळे करतो असे दाखवायचे. सुरुवातीच्या काळात असे सांगण्यात आले या नोटा संध्याकाळपासून बंद होतील आणि देशात चमत्कार होईल. पण देशात चमत्कार एवढाच झाला की, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्ध्वस्त झाले. हे चमत्कार केल्यानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे. बघुया याचे पुढे काय होते, या शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here