मुंबई,दि.२४: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते.
हेही वाचा Viral: विनाकपडे स्टाईलमध्ये पोज देणारा हा मुलगा आज BOLLYWOODचा आहे मोठा स्टार
हेही वाचा महिलांचे अश्लील न्यूड डान्स प्रकरण, पोलिसांनी केली मोठी कारवाई
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) धोका असल्याने तिसऱ्या लाटेत खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक करण्यात आले. तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली, पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे, विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर अनेक नेत्यांनी मात केली आहे.