Sharad Pawar Madha:“सगळ्यांचा नाद करायचा पण…” शरद पवार 

0

सोलापूर,दि.17: Sharad Pawar Madha: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर सोलापूरमधील माढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्यासाठी प्रचार घेतली. प्रचाराच्या तोफा उद्या (दि.18) पाचनंतर थंडावणार आहेत. पवारांनी राज्यात एकामागून एक सभांचा धडाका लावल आहे. ते प्रत्येक सभा गाजवत आहेत. शरद पवारांनी माढ्याच्या सभेत बबन शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 

काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar Madha

या दोघा भावांना यावेळी असं पाडायचं की महाराष्ट्रात संदेश गेला पाहीजे. सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवाराचा नाद करायचा नाय असं सांगत त्यांनी सभा गाजवून सोडली. त्यांच्या या वाक्याने माढ्याच्या सभेत उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. अभिजीत पाटील यांच्याविरोधात या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे चिरंजीव रणजीत शिंदे हे मैदानात आहेत.

मी आतापर्यंत सात निवडणुका लढलो. काही लोक आपल्यामुळे निवडून येतात आणि नंतर सोडून जातात. 1980 सालची निवडणूक झाली, त्यावेळी आमचे 58 उमेदवार निवडून आले. मी परदेशात गेलो असताना मुख्यमंत्री अंतुलेंनी चमत्कार केला आणि 52 लोक घेऊन गेले आणि मी फक्त 6 लोकांचा नेता राहिलो. तेव्हा विरोधीपक्षनेतेपद गेलं. पण मी नंतरचे तीन वर्ष अहोरात्र प्रयत्न केले. जे मला सोडून गेले त्यांच्याविरोधात मी नव्या पिढीचे उमेदवार दिली. त्यावेळी सोडून गेलेले सर्व 52 उमेदवार पडले असं शरद पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here