शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच येणार एकत्र

0

मुंबई,दि.19: शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच येणार एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज संध्याकाळी (बुधवार, 19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेणार आहेत. वानखेडे स्टेडिअमवर या नेत्यांची भेट होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची भेट होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तिन्ही नेते एकाच ठिकाणी येणार असल्यामुळे या डिनर डिल्पोमसीला महत्व प्राप्त झाले आहे.

20 ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक पार पडणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानावर डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. याला शरद पवार उपस्थित राहणार असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण ही राजकीय भेट नसल्याचं दोन्ही गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते क्रिकेटसाठी एकत्र येत आहेत. यामध्ये कोणताही राजकीय चर्चा होणार नाही, असे सांगितलं जात आहे. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार अन्य राजकीय नेते आणि स्पर्धकांसोबत वानखेडे स्टेडिअमच्या गरवारे क्लबमध्ये जेवणाचा अस्वाद घेणार आहेत.

शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणारी भेट एमसीए निवडणुकीच्या संदर्भात आहे. ही भेट फक्त एमसीएच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी आहे. यामध्ये कोणताही राजकीय चर्चा होण्याची शक्यात नाही, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितलं. अमोल काळे यांचा विजय निश्चित करण्यासाठी हे तिन्ही नेते भेटणार असल्याचेही सुत्रांनी सांगितलं.

अमोल काळे हे एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष असले तरी मुंबई क्रिकेट आणि त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी काळेंची ओळख असली तरी एमसीएत आशिष शेलारांनी त्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही एमसीएच्या मतदारांची खास बैठक घेऊन काळेंच्या पंखात नवं बळ भरलंय.

एमसीएच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडूनच कार्यकारिणीसाठी आपलं नशीब आजमावतायत. त्या तिघांच्या उमेदवारीनं कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी तब्बल 23 जणांमधली शर्यत आणखी चुरशीची बनवलीय. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here