मुंबई,दि.15: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उध्दव ठाकरे यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी मुंबईतील मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत खेद व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दु:ख हलकं होणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली.
कोणाचं हिंदुत्व खरं आहे, हे समजून घ्यावे लागेल, पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असे परखड मतही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे स्वागत केले व आशीर्वाद घेतले.
आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पाप-पुण्याची भावना आपल्याकडे आहे. सगळ्यात मोठा धोका आणि घात म्हणजे विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. याबाबत अनेकांना दुःख आहे. त्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आपण मातोश्रीवर आलो आहोत. त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना सांगितले जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत, तोपर्यंत जनतेच्या मनातील दुःख कमी होणार नाही.