Shane Warne Death: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन

0

दि.4: Shane Warne Death: जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne Death) आता या जगात नाही. गुरुवारी संध्याकाळी ही दु:खद बातमी समोर आली. माहितीनुसार, शेन वॉर्न थायलंडमधील त्याच्या घरामध्ये उपस्थित होता, तिथेच त्याचा मृत्यू झाला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे तो आता आपल्यात नाहीत, असे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न थायलंडमध्ये उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या घरामध्ये उपस्थित होता, आणि तेथे तो बेशुद्धावस्थेत आढळला.

1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने 145 कसोटीत 708 विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही 194 सामन्यांत त्याच्या नावावर 293 विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. 1996 व 1999 च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here