दि.29: रांची रिम्समध्ये (झारखंड) 5 दिवस आयुष्याचे ‘युद्ध’ लढणाऱ्या अंकिताचा रविवारी मृत्यू झाला. रविवारी रांची येथे मृत्यू झालेल्या झारखंडच्या मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या शाहरुखने 23 ऑगस्ट रोजी पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. याप्रकरणी आरोपी शाहरुखसह दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख एकतर्फी प्रेमात वेडा झाला होता आणि त्या मुलीसोबत गैरवर्तन करत होता, असा आरोप आहे.झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या तरुणाने मंगळवारी एकतर्फी प्रेमात अयशस्वी झाल्याने 12 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीला जिवंत जाळले. यामुळे तिचा मृत्यू झाला. अंकिता असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. 12वीच्या मार्कशीटनुसार अंकिताचे वय 15 वर्षे 9 महिने 2 दिवस होते. अंकिताच्या मृत्यूनंतर दुमका येथे निदर्शने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दुमका येथे कलम 144 लागू केले आहे. दुमकाचे पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी सांगितले की, रविवारी पहाटे अडीच वाजता अंकिताचा रांची येथील रिम्समध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर अंकिताचा मृतदेह दुमका येथे आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की जेरुवाडीह परिसरातील मुलीच्या घरी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.एकतर्फी प्रेमात अयशस्वी झालेल्या अल्पसंख्याक समाजातील शाहरुखने 23 ऑगस्ट रोजी शेजारील व्यापारी संजीव सिंह यांची मुलगी अंकिता हिला रात्री उशिरा झोपेत असताना खिडकीतून पेट्रोल ओतून पेटवून दिले होते, ज्यामध्ये ती 90 टक्के भाजली. अंकिताला प्रथम दुमका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला रांची रिम्समध्ये रेफर करण्यात आले. येथे उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला.