शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर: आमदार अमोल मिटकरी

0

अकोला,दि.31: आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) शिंदे गटाचे (Shinde Group) जॉनी लिव्हर आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टाेला आमदार अमाेल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शहाजीबापू पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.

“शहाजीबापू हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटात त्यांचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता त्यांनी करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राची करमणूक करणारे नवे जॉनी लिव्हर आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (Sanjay Raut) होणार असं वक्तव्य नुकतेच केले हाेते. अमोल मिटकरींनी आमदार शहाजी पाटलांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देत ते सध्याच्या सरकारममधील करमणुकीचं पात्र आहे असे म्हटलं आहे.

मिटकरी म्हणाले शिंदे गटात कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही. त्यांची ही शेवटीचं टर्म राहील असेही मिटकरींनी नमूद केले.

दरम्यान गणपती स्थापनेवरूनही मिटकरींनी आज राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. अनेक लोक अमोल मिटकरी यांना नास्तिक म्हणतात या संदर्भात बोलले आहेत. काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात, मात्र मी पूर्णपणे दहा दिवसाचा गणपती बसवतोय असा टाेला मिटकरींनी ठाकरेंना हाणला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here