मुंबई,दि.25: वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून गंभीर आरोप केला आहे. भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आंबेडकर यांनी आरोप केला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. राज्यात सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पॅरा 56 किंवा 57 मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्यासमोर तसा अहवाल आला. त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले. हा सर्व खेळ भाजपचा आहे. अजित पवार यांचा आहे. एनसीपीचा आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे असा अहवाल आला नसता तर… यामुळे यांच्यापासून गरीब मराठ्यांना सावध राहिले पाहिजे.
अशी केली विभागणी
एकनाथ शिंदेवर भाजपाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडला तर देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत ओबीसांना गोंजरले जात आहेत. यामुळे ओबीसींनी ओळखावे की भाजपा हा माकडाचा खेळ करत आहे. भाजपचा डाव कोणालाच आरक्षण द्यायचा नाही. सर्वांचे आरक्षण काढण्याचा आहे. भाजप रामाचे भक्त आहेत. परंतु ओबीसीचे भक्त नाही.