security alert: या पैकी जर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड असेल तर लगेच बदला

0

security alert: अनेकांचा पासवर्ड (Password) हा त्यांच्या नावाने, जन्मतारखेवरून ठेवण्यात आलेला असतो. अनेकजण लक्षात राहावा म्हणून सोपा पासवर्ड ठेवतात. असे काही कॉमन पासवर्ड (Common Passward) असतात जे सर्रास वापरले जातात.

नॉर्डपासकडून (Nordpass) जारी करण्यात आलेल्या यादीत पासवर्डच्या रुपात वापरण्यात येणाऱ्या सर्वात सामान्य नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खालीलपैकी कोणताही पासवर्ड तुम्ही ठेवला असेल तर लगेच बदलून टाका

सिक्युरिटी सोल्यूशन कंपनी नॉर्डपासने (Nordpass) सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या कॉमन पासवर्डची यादी जाहीर केली आहे. ही कंपनी दरवर्षी ‘टॉप-200 मोस्ट कॉमन पासवर्ड’ची यादी जाहीर करत असते.

हॅकर्स सहजपणे काही मिनिटांत तुमचं अकाऊंट हॅक करतील अशा कॉमन पासवर्डचा समावेश या यादीत करण्यात येतो. त्यामुळे कोणताही विचार न करता तुमच्या कोणत्याही ऑनलाइन अकाऊंटचा पासवर्ड सेट करत असाल तर त्याआधी ही माहिती जरूर वाचा.

हॅकर्स सहजपणे काही मिनिटांत तुमचं अकाऊंट हॅक करतील अशा कॉमन पासवर्डचा समावेश या यादीत करण्यात येतो. त्यामुळे कोणताही विचार न करता तुमच्या कोणत्याही ऑनलाइन अकाऊंटचा पासवर्ड सेट करत असाल तर त्याआधी ही माहिती जरूर वाचा.

लक्ष्मी, सुंदर, मनिष, मनिषा, नवीन, निखिल, प्रियंका, प्रकाश, पूनम, प्रशांत, प्रसाद, पंकज, प्रदीप, प्रवीण, रश्मि, राहुल, राजकुमार, राकेश, रमेश, राजेश, साईराम, सचिन, संजय, संदीप, सुरेश, संतोष, सिमरन, संध्या या नावांचाही या यादीत समावेश आहे. त्यामुळे या नावांपैकी तुम्हीही एखादं नाव पासवर्ड म्हणून ठेवलं तर असेल तर तातडीनं बदला.

स्ट्राँग पासवर्ड म्हणजे काय?

बहुतांश लोक पासवर्ड स्वरुपात त्यांचं स्वत:चं नाव, जन्म तारीख, फोन नंबर किंवा इतर वैयक्तिक माहितीचा वापर करतात. सिक्युरिटी एक्स्पर्टच्या माहितीनुसार अशापद्धतीचे पासवर्ड हॅकर्स काही मिनिटांत ब्रेक करू शकतात. तर कधी कधी काही सेकंदात पासवर्ड ब्रेक होतात.

एका मजबूत पासवर्डबाबत विचार करायचा झाल्यास सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टनं दिलेल्या सल्ल्यानुसार पासवर्डमध्ये अक्षरं, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स यांचा समावेश असायला हवा. कठीण पासवर्ड लक्षात ठेवणं खूप त्रासदायक वाटत असलं तरी तुमचं अकाऊंट त्यामुळे सुरक्षित राहतं हे विसरून चालणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here