नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कलम 36, 38 लागू

0

सोलापूर,दि.23: यंदा सोलापूर जिल्ह्यात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. 9 ऑक्टोबर 2022 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीदेवी मुर्तीची प्रतिष्ठापना मिरवणुकीने होते. या कालावधीत शक्तीदेवीची पुजाअर्चा, विविध प्रकारचे कार्यक्रम व विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात (सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) विना परवाना कोणतेही मोर्चे, मिरवणूका, निदर्शने, पदयात्रा, वाद्य, गायन, गोंगाट करण्यास ग्रामीण महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36, 38 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मनाई करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जाहीर केला आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन असलेले पोलीस ठाणे अंमलदार व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म.पो. का. 1951 चे कलम 36, 38 पोट कलम 2 अन्वये अशा मोर्चे, मिरवणूका, निदर्शने, पदयात्रा, गोंगाटास, आवाजास मनाई करण्यासाठी त्यांचे नियंत्रण व विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सूचना कोणत्याही व्यक्तीस देण्यासाठी अधिकार देत आहे. कोणत्याही इसमास सदरचा आदेश लागू असेपर्यंत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून ) कोणतेही वाद्य, गायन, वाद्य संगीत साधन, पात्र ज्यातून प्रतिध्वनी निर्माण होईल असे यंत्र ज्यातून आवाज निर्माण होतो असा व्यवसाय किंवा कार्यक्रम संबंधीत ठाणेदार किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवाना घेतल्याशिवाय वाजविता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

जाहीर सभा, मिरवणूका, मोर्चे, पदयात्रेत समायोचित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवू शकते, अशा घोषणा देवू नये, असेही आदेशात म्हटले आहे. पोलीस यंत्रणेने कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे.

हा आदेश लग्नाच्या प्रसंगास व प्रेत यात्रेस लागू नाही. आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम अन्वये शिक्षेस पात्र राहिल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here