शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा टिझर प्रदर्शित

0

मुंबई,दि.25: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु मला सत्तेची चटक लागली नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं मी बोललो नव्हतो. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी दुकानदारी बंद करून बसेन? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. 

सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. 

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु सत्तेची चटक लागली नाही या एका गोष्टीचं माझ्या मनात समाधान आहे. मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या बहुचर्चित मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या ‘जोरदार’ मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. पहिल्या टिझरनंतर आता दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बेधडक सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचं पाहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here