‘Scooty Viral Video: स्कूटी विनाचालक सुरू झाली आणि…’ Video व्हायरल

Scooty Viral Video: सध्या सोशल मीडियावर स्कूटीशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे

0

नवी दिल्ली, दि.9: Scooty Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. अनेक व्हायरल व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात. बरेचसे व्हिडिओ प्राणी, पक्षी यांचे असतात. सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओही व्हायरल होतात. व्हायरल व्हिडिओत अनेकदा आश्चर्यकारक घटना पहावयास मिळतात. बाईकपेक्षा विना गिअर वाहन चालवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. पूर्वी लोक बाईक विकत घेण्याकडे जास्त लक्ष देत असत, पण आता बहुतेक लोक स्कूटी घेण्यास प्राधान्य देत आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते ऑपरेट करणं सोपं आहे. यामध्ये बाईकप्रमाणे पुन्हा-पुन्हा गिअर्स बदलण्याचा त्रास होत नाही. फक्त एक्सीलेरेटर आणि ब्रेक कंट्रोल करणं आवश्यक आहे. (Scooty Viral Video)

स्कूटीशी संबंधित व्हिडिओ व्हायरल | Scooty Viral Video

मात्र, काही वेळा त्यावरही लोकांचं नियंत्रण नसतं आणि अशा वेळी ते अपघाताचे बळी ठरतात. सध्या सोशल मीडियावर स्कूटीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. कारण यामध्ये चालक नसतानाही स्कूटी स्वतःहून धावू लागते आणि दुसऱ्या स्कूटीस्वाराला धडकते. (Scooty Viral Video)

स्कूटी स्वतःहून पुढे जाऊ लागते… | Viral Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी दुकानात काही सामान खरेदी करत आहे आणि तिची स्कूटी बाहेर उभी आहे. यादरम्यान, दुसरा स्कूटी स्वार तिथून जाण्याचा प्रयत्न करताच, मुलीची स्कूटी स्वतःहून पुढे जाऊ लागते आणि त्या दुसऱ्या स्कूटीस्वाराला धडकते. बिचारा स्कूटीस्वार या धडकेत आपल्या स्कूटीसह खाली पडतो.

असा अपघात क्वचितच पाहिला असेल

हे दृश्य पाहणारे बाकीचे लोक स्कुटी स्वतःहून कशी पुढे जाऊ लागली हे पाहून थक्क झाले. ज्या मुलीकडे स्कूटी होती ती देखील आश्चर्यचकित झाली. असा मजेदार अपघात तुम्ही क्वचितच पाहिला असेल. या मजेशीर अपघाताचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘वाईट वेळ आली की चालक नसतानाही स्कूटी धडकते. विश्वास बसत नसेल तर बघा.’

अवघ्या 9 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘खरंच काय झालं, कसं झालं?’, तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, ‘पप्पाची परी पळत सुटली असावी’. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘आत्मा आणि शरीर वेगळे आहेत. आज ते सिद्ध झाले आहे,.’ तर एका वापरकर्त्याने स्कूटीला ‘घोस्ट स्कूटर’ म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here