Satyendra Jain: तुरूंगात मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा फिजिओथेरपिस्ट नव्हे बलात्कारी

Satyendra Jain News: आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता

0

नवी दिल्ली,दि.23: Satyendra Jain News: तुरूंगात मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा फिजिओथेरपिस्ट नव्हे तर बलात्कारी असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिहार जेलमध्ये असलेल्या मंत्री सत्येंद्र जैन यांचा (Satyendra Jain) Video व्हायरल झाला होता. तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेले आपचे (AAP) मंत्री सत्येंद्र जैन(Satyendra Jain) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज करताना दिसले. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली.

मसाज करणारा फिजिओथेरपिस्ट नव्हे बलात्कारी

अलीकडेच तिहार जेलमधून एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांचा मसाज करताना दिसत आहे. आता तिहार तुरुंगातील सूत्रांकडून समजले आहे की, तो व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून ती बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी आहे. त्याचे नाव रिंकू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रिंकूवर POCSO च्या कलम 6 आणि IPC च्या कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्येंद्र जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तत्काळ सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होते. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे होते.

सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द

शनिवारी तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. व्हायरल फुटेजमध्ये सत्येंद्र जैन त्यांच्या सेलमध्ये मसाज करताना दिसत होते. तुरुंगाच्या कोठडीत एक व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसला. याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत. सत्येंद्र जैन सध्या तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. सत्येंद्र जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुरुंग बदलण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here