नवी दिल्ली,दि.23: Satyendar Jain Video: तिहार तुरुंगातील दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा आणखी एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ 13 सप्टेंबरचा आहे. यामध्ये सत्येंद्र जैन जेवण करताना दिसत आहेत, तर सत्येंद्र जैन यांच्या वतीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती की, त्यांनी 6 महिन्यांपासून अन्नाचा एक दाणाही खाल्ला नाही.
सत्येंद्र जैन यांनी जेवण न करण्यामागचे कारण न्यायालयाला सांगितले होते की, जैन धर्मानुसार मंदिरात जाऊन पूजा केल्याशिवाय शिजवलेले अन्न खाऊ शकत नाही. ते फक्त फळे आणि कच्च्या भाज्यांवर अवलंबून आहेत. तेही तिहार तुरुंग प्रशासनाने बंद केले आहे.

28 किलो वजन कमी झाल्याचा दावा
त्यामुळे त्यांचे वजन 28 किलोने कमी झाले आहे. त्याचवेळी, सत्येंद्र जैन यांचे वजन 8 किलोने वाढल्याचा तुरुंग प्रशासनाचा दावा आहे. न्यायालयाने याप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्याकडून अहवाल मागवला होता. त्यावर आज निर्णय दिला जाणार आहे.
काल तुरुंगात बंद दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात अर्ज दाखल करून तिहार अधिकाऱ्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार अन्नपदार्थ पुरवण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. या अर्जावर विशेष न्यायाधीश विकास ढाल यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या अर्जात तुरुंग अधिकाऱ्यांना तात्काळ मंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या अर्जात तुरुंग अधिकाऱ्यांना तात्काळ मंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. जैन यांचे वकील मोहम्मद इर्शाद यांनी सांगितले की, जेलमध्ये जैन यांना मूलभूत भोजन आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात नाहीत. कसाबवर निष्पक्ष खटला सुरू करून त्याला सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. ते म्हणाले मी त्याच्यापेक्षा वाईट नाही.
कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, जैन धर्मानुसार जेलमध्ये जेवण मिळत नाही, 5 महिन्यांत वजन 28 किलोने कमी झाले आहे. 31 मे रोजी अटक झाल्याच्या दिवसापासून ते कोणत्याही जैन मंदिरात जाऊ शकला नाहीत आणि “जैन धर्मावर गाढ श्रद्धा ठेवत असल्याने ते धार्मिक उपवास पाळतात आणि शिजवलेले अन्न, डाळी, धान्य आणि दूध खात नाहीत” ते “जैन धर्माचे काटेकोरपणे पालन करतात” असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
अर्जात म्हटले आहे की, गेल्या 12 दिवसांपासून जेल प्रशासनाने जैन यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार अन्नधान्य देणे बंद केले आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की धार्मिक उपवास दरम्यान अन्नपदार्थ रोखणे “बेकायदेशीर”, “मनमानी” आणि “दडपशाही” आहे.
अर्जात असे म्हटले आहे की जैन यांना 21 ऑक्टोबर रोजी एमआरआय स्कॅनसह वैद्यकीय तपासणीसाठी जायचे होते, परंतु तुरुंग अधिकाऱ्यांनी काही तरी कारण सांगत किंवा इतर कारणांमुळे त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नाही.
मसाज करून घेतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता
मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिहार जेलमध्ये असलेल्या मंत्र्याचा Video व्हायरल झाला होता. कोठडीमध्ये सत्येंद्र जैन यांची कशा प्रकारे सेवा सुरू आहे, याचा व्हिडीओ समोर आला होता. सत्येंद्र जैन जेलमध्ये पायाची मालिश करून घेत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.