Satish Kaushik Passes Away: अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन

0

नवी दिल्ली,दि.9: Satish Kaushik Passes Away: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी काही विनोदी भूमिका देखील साकारल्या.

अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 45 वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले.

वयाच्या 67 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी याची पुष्टी केली आहे. “मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. पण मी माझ्या हयातीत हे आपले खास मित्र सतीश कौशक यांच्याबद्दल लिहीन याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. 45 वर्षांच्या मैत्रीवर अचानक पूर्णविराम. सतीश, तुझ्याशिवाय माझं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल. ओम शांती,” असं अनुपम खेर यांनी म्हटलंय.

सतीश कौशिक यांचे चित्रपट | Satish Kaushik

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात अशोक ही भूमिका साकारली. तसेच 1983 मध्येच रिलीज झालेल्या वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. मिस्टर अँड मिसेस खिलाडी, क्यू की मैं झूठ नहीं बोलता यांसारख्या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकरली. अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटात सतीश यांनी काम केलं. गोविंदा आणि सतीश यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सतीश यांचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना रनौतनं दिग्दर्शित केलेल्या इमर्जन्सी या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम ही भूमिका साकारली.

Satish Kaushik Passes Away
सतीश कौशिक

मालिकांमध्ये देखील केलं काम

सतीश यांनी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी कथा सागर, मे आय कम इन मॅडम या मालिकांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी स्कॅम 2020 या सीरिजमध्ये देखील काम केलं. त्यांनी या सीरिजमध्ये मनु मुंद्रा ही भूमिका साकारली होती.

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here