Satish Kaushik: सतीश कौशिक यांनी निधनाच्या आधी केलेलं हे शेवटचं ट्वीट

0

मुंबई,दि.9: Satish Kaushik Last Tweet: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन विविध क्षेत्रातील लोक शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान सतीश कौशिक यांचं शेवटचं ट्विट आता व्हायरल होत आहे.

सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. 1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1993 मध्ये त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी जवळ जवळ वीसएक दिग्दर्शित केली आहेत.

मित्रांसोबत खेळले धुळीवंदन | Satish Kaushik

सतीश कौशिक यांनी त्यांचे शेवटचे ट्वीट 7 मार्च रोजी रात्री केलं. सतीश कौशिक यांनी त्यांच्या धुलीवंदनाचे फोटो ट्वीट केले होते, ज्यामध्ये ते रिचा चड्ढा, अली फजल, जावेद अख्तर आणि महिमा चौधरी यांच्यासोबत दिसत होते. जुहू येथील जानकी कुटीर येथे होळी खेळल्याची माहिती सतीश यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली होती. या ट्वीटद्वारे त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सतीश यांचे हे फोटो पाहून ते आता आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवता येणं जड झालं आहे.

सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बधाई, तेरे नाम, क्योंकि, ढोल आणि कागजसारख्या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता म्हणून त्यांनी मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर और मिसेज खिलाड़ी, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, परदेसी बाबू, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएगी, राजा जी, आ अब लौट चलें, हम आपके दिल में रहते हैं, चल मेरे भाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here