Satara Crime: भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यामागे आढळला मृतदेह 

0

सातारा,दि.31: Satara Crime: भाजपाच्या माजी आमदाराच्या (Former BJP MLA) बंद बंगल्यामागे अर्धवट पुरलेला मृतदेह सापडला आहे. सातारा तालुक्यातील वाढे येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल माहिती घेण्याचे काम सुरू होते. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला | Satara Crime

बंगल्यामागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. आमदाराच्या बंगल्यामागेच हा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

कुजलेल्या स्थितीत मृतदेह | Satara Crime News

माजी आमदार नलवडे यांचा साताऱ्यातील वाडे या गावात एक जुना बंगला आहे. हा बंगला मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. मात्र बंगल्याच्या मागे सफाई करताना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह चिखलात टाकून देण्यात आला होता. कुजलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह पाहून येथे एकच खळबळ उडाली.

सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत ते वाढे येथे होते. मृतदेह कोणाचा आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. तर वाढे येथे मृतदेह आढळून आल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिस अधिक तपास घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here