Santander: लोकांच्या खात्यामध्ये बँकेने चुकून पाठवले 1300 कोटी रुपये

0

दि.31: Santander: अनेकवेळा बँकेतील कर्मचाऱ्याकडून पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात जमा केले जातात. अशावेळी चुकीच्या खात्यात (Account) जमा केलेली रक्कम बँक परत घेते. त्याच बँकेतील दुसरे खाते असेल तर बँकेला पैसे परत घेण्यास अडचण नाही. असाच प्रकार प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. दरम्यान, यूकेच्या Santander बँकेने चुकून 75 हजार लोकांना बँकेच्याच 2 हजार अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केले. एकूण 130 मिलियन पौंड म्हणजेच जवळपास 1300 कोटी रुपये पाठवले आहेत. आता बँक हे पैसे लोकांकडून परत मागत आहे, मात्र लोक ते परत करायला तयार नाहीत.

25 डिसेंबर रोजी Santander बँकेकडून हा घोळ झाला. विशेष बाब म्हणजे Santander कडून हे पैसे Barclays, HSBC, NatWest, Co-operative Bank आणि Virgin Money या प्रतिस्पर्धी बँकांच्या ग्राहकांच्या अकाउंटवर गेले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, हे पैसे बँकेत परत येणार नाहीत, अशी भीती Santander बँकेलाही आहे.

दरम्यान, बँकेकडे पैसे परत मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे बँक जबरदस्तीने ग्राहकांना पैसे परत पाठवण्यास सांगेल. तसेच, बँकेकडे दुसरा मार्ग म्हणजे संबंधित ग्राहकांकडे जाऊन रक्कम परत मिळवणे. याचबरोबर, बँकेकडून एक स्टेटमेंटही आले आहे, ज्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

10 वर्षांपर्यंत तुरुंगवास

यूकेच्या कायद्यानुसार, ग्राहकाच्या अकाउंटमध्ये चुकून जमा झालेले पैसे बँका परत घेऊ शकतात. जर ग्राहकांनी पैसे परत केले नाहीत तर त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. Santander या बँकेच्या यूकेमध्ये सुमारे 1.40 कोटी ग्राहक आणि 616 शाखा आहेत. Santander UK ही ग्लोबल बँक Banco Santander ची सहयोगी बँक आहे.

या आधी अमेरिकेच्या सिटी बँकेने देखील कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉनच्या (Revlon) कर्जदारांना चुकून 90 कोटी डॉलर दिले होते. यावेळी बँक यामधून 50 कोटी डॉलर वसूल करू शकली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने न्यायालयात धाव घेतली. परंतु फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने सांगितले की, बँकेला ते वसूल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here