शिंदे गटाच्या आमदाराने केला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.3: शिंदे गटाच्या आमदाराने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणं केली. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. या सभेवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनीही प्रत्यारोप केला आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. 

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट | Ashok Chavan

आमदार संजय शिरसाट म्हणाले,’काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, अशोक चव्हाण आणि बाकीच्या नेत्यांचं पटत नाही, त्यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही आमदार संजय शिरसाट यांनी केला. 

काल महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुनही राजकीय चर्चा सुरू आहेत. यावरुनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत सांगत आहेत मग आज ते कोर्टात चालले आहे, यावरुनच महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here