मुंबई,दि.१२: Sanjay Shirsat Video Viral | शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (शिंदे गट) मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिरसाट हॉटेलच्या खोलीत बसून सिगारेट ओढत आहेत. त्यांच्याकडे दोन बॅगा आहेत. एका बॅगेत नोटा भरलेल्या आहेत.
विटस् हॉटेल खरेदी प्रकरणात अडचणीत सापडलेले संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यापाठोपाठ शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट धरत फोनवर बोलतानाचा बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट? | Sanjay Shirsat Video Viral
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. त्यानंतर हा माझीच बेडरूम असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. मात्र त्या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले.
संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ

शिरसाट यांच्या मालमत्तेत मागील पाच वर्षांत 12 पट वाढ झाल्याबाबत आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले आहेत. त्यातच समोर आलेल्या या व्हिडीओमुळे शिरसाट गोत्यात आले आहेत.