मुंबई,दि.१२: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा-शिवसेना युती राज्यात १९९५ साली सत्तेत होती. यानंतर युतीची सत्ता गेली. १९९९ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं, परंतु मुख्यमंत्रिपदाच्या वादातून ती सत्ता गेली.
मुख्यमंत्रीपदाची लालसा तेव्हाही त्यांच्या मनात होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्याला विरोध होता असं विधान शिवसेना आमदार संजय शिरसाटयांनी केले आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार आमदार संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या एकमेकांमधील सुसंवादामुळे १९९५ ची सत्ता चालली, परंतु ९९ ला आपल्या हाती सत्ता येतेय, परंतु मुख्यमंत्री कोण या वादातून आलेली सत्ता गमावली. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते ते उद्धव ठाकरेंना सहन झालं नव्हते.
मुंडेना मुख्यमंत्री करा असं अनेक आमदारांनी सांगितले होते. परंत तेव्हाही यांच्या मनात मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होती. याला शिवसेनाप्रमुखांचा विरोध होता. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव ही गोपीनाथ मुंडे यांनी केली. मनोहर जोशी, नारायण राणे यांनीही आमदारांची जुळवाजुळव प्रयत्न केला, त्याला छेद उद्धव ठाकरेंना दिला असं त्यांनी म्हटलं.