मुंबई,दि.6: शिवसेना नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी X वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत हल्लाबोल केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर शुभेच्छा देत असतानाचा फोटो सोमवारी (दि.6) व्हायरल झाला. अशातच आज (दि.6) संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे.
कोथरुड परिसरात निलेश घायवळ याच्या टोळीची दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़. संजय राऊत यांनी फोटो शेअर करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेनेकडून युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण अनिकेत हा हेमंत दाभेकर याला घेऊन आला होता.