sanjay raut news: सरकार बदलल्यावर सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल संजय राऊत यांचा इशारा

sanjay raut | कोणतेही सरकार कायम असत नाही, सर्वाचा हिशोब पूर्ण केला जाईल संजय राऊत यांचा इशारा

0

नाशिक,दि.15: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut news) यांनी सरकार बदलल्यावर सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा दिला आहे. आयएनएस ‘विक्रांत’ निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. दरम्यान सोमय्यांनी क्लीन चिट देण्यात आल्यानंतर संजय राऊतांनी (sanjay raut news) 2024 मध्ये हिशोब केला जाईल असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत | sanjay raut news

कोणतही सरकार कायम असत नाही. 2024 सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल अशा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट मिळाली आहे. यावर बोलताना राऊतांनी इशारा दिला. तसेच याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचे राऊत म्हणाले. ते आज सकाळी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

sanjay raut news

हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा

“सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलत ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. मग तो एक रुपया असेल किंवा 50 कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असं म्हणतात आणि राजभवन म्हणतं पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसतं

क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र, क्लिनचिट मिळत नसल्याचे राऊत म्हणाले. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी झालेला हा खेळखंडोबा आहे. पण आज जरी क्लीन चिट मिळाली असली तरी 2024 ला हे प्रकरण समोर येणार नाही असं नाही. कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल,” असा इशारा संजय राऊतांनी दिली आहे. मी याप्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सीमाभागाचा प्रश्न महत्वाचा

जरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शाह यांनी भेटले असले तरीसुद्धा सीमाभागत तणाव आहे. आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. आम्ही काय होते ते बघू. पण सीमाभागाचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here