Sanjay Raut Tweet: शिवसेना नेते संजय राऊत यांचे सूचक ट्विट

0

मुंबई,दि.17: Sanjay Raut Tweet: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. राज्यात नवीन सरकार आले.

मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार होणं बाकी आहे. यासोबतच अनेक बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवारही आहे. यावरुन विरोधक सातत्याने टिका करताना दिसत आहे. यादरम्यान आता संजय राऊतांनीही एक ट्विट (Sanjay Raut Tweet) करत टोला लगावला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांनी शनिवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं ‘बार्बाडोसची लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे, मात्र तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात 27 मंत्री आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही इथे 2 मंत्री हवे तसे निर्णय घेत आहेत. इथे राज्यघटनेचं पालन होतंय का? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात निर्णय देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तर, आज केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी बहुमताचं पत्र राज्यपालांना देत असतानाचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर भाजपा नेत्यांचा फोटो ट्विट केला आहे. फोटोला त्यांनी सूचक कॅप्शनही दिलं आहे. “उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिआ तो कब्र पर भी जल रहा है!” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. कॅप्शनच्या शेवटी त्यांनी ‘वेट अँड वॉच’ असंही लिहिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here